Breaking News

अजित दादांनी प्रतिभा काकींच्या शब्दांचा मान राखला!

PratibhaTai Ajit Pawar
अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून 23 नोव्हेंबरच्या सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अख्या महाराष्ट्राला आश्‍चर्याचा धक्का बसला. तसेच अजित पवारांनी हा निर्णय घेणे पवार कुटूंबियांसाठीदेखील धक्कादायक मानले जात होते. त्या दिवसापासून अजित पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ ,श्रेष्ठ, वरीष्ठ मंडळींनी त्यांची मनधरणी करण्याचा टोकाचा प्रयत्न केला होता. पवार कुटूंबियातून सुप्रिया सुळे यांनीही अजित दादांची मनधरणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही अजित पवारांनी काहीह प्रतिक्रिया न देता शांत राहीले. परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आणि काकी प्रतिभा पवार शरद पवारांच्या पत्नी यांनी समजूत घातल्यानंतर अजित पवारांनी आपल्या काकींच्या शब्दांचा मान राखला. त्यांच्या प्रेमाला जागलं असे बेलल्या जात आहे. एव्हाना अजित पवारांचे पुतणे यांनीही फेसबूक पोस्टमधून कालंच अजित काकांना परत येण्याचे बावनीक आवाहन केले होते. तर आज सकाळी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा काकी तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन त्यांना भेटले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर पवार कुटूंबियाची अजितदादांसोेबतची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रामुख्याने शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा काकी राजकीय बाबींपासून फार लांब राहतात. त्या कधीच राजकीय गोष्टींमध्ये काडीचेही लक्ष घालत नाहीत. यावेळी पहिल्यांदा प्रतिभा पवार ऑन द फ्लोअर येऊन पुतणे अजित पवार यांची समजूत घालण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. तसेच सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे हेदेखील कधीही राजकारणात लक्ष घालत नाही वा कधीही ते प्रसिद्धीसदेखील येत नाही. त्यांनीदेखील या प्रकरणात हस्तक्षेप करून अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी पुढे सरसावले. अखेर कुटूंबाच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी वैयक्तीक कारणास्तव राजीनामा देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.