Breaking News

अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर

शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut
मुंबई
भाजप आणि अजित पवार यांच्यात सत्तास्थापनेसंदर्भात झालेल्या चर्चेसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपकडून अजित पवार यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदांची ऑफर देण्याचा आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपने सत्तेचा कितीही गैरवापर करावा, पण आम्ही पुरून उरू, असे सांगतानाच, विश्‍वासदर्शक ठरावावेळी आमचा आकडा दहाने जास्त असेल, असे देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात येणार असे वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्याने राज्याच्या राजकारणांला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर अजूनही काही आमदार ’बेपत्ता’ असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अशी ऑफर देऊ केली आहे, असा दावा राऊत यांनी केला. मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी या देशातील राज्यकर्ते कुठल्या थराला जात आहेत. हे सगळे घृणास्पद आहे. बहुमत असल्याचे राज्यपालांना सांगितले आणि शपथ घेतली. मग गुंडगिरी, दरोडेखोरी हे सगळे करण्याची गरज काय आहे. भाजपने असे करून राज्यपाल, राष्ट्रपती आणि महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे, अशी तोफही त्यांनी डागली. यावेळी राऊत यांनी भाजपवर तोफ डागली. सत्तेचा कितीही गैरवापर करा. आम्ही पुरून उरू. कितीही गडबड, घोटाळे करा, पण विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावावेळी तुमच्यापेक्षा आमच्याकडे दहाने आकडा अधिक असेल, असा दावा त्यांनी केला. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असे वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्याने राज्याच्या राजकारणला वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर, भाजप बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.


राष्ट्रवादीच्या आमदारांना हरयाणात डाबूंन ठेवले होते
अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्वच आमदार परतले आहेत. काही आमदारांना गुरूग्रामच्या एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी भाजपवर केला. आमदारांच्या सुटकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकही गेले होते. त्यांना परत आणण्यात आले आहे. ते आमदार आता भाजपने कशा प्रकारे दबाव आणला, याचा वृत्तांत सांगत आहेत. त्यांना काही ऑफर देण्यात आल्या, तर काहींना भीती दाखवण्यात आली, असा दावाही राऊत यांनी केला. हॉटेलमध्ये पाच ते सहा लोकांना डांबून ठेवले होते. त्यांच्यावर पहारा देण्यासाठी भाजपने गुंड ठेवले होते, हरयाणात सरकार असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन पोलीस बाहेर तैनात केले होते. लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.