Breaking News

'राष्ट्रवादी' तर्फे अभिनंदनाचा ठराव

कोपरगाव / प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महाराष्ट्र विकास आघाडीचे उद्धव ठाकरे विराजमान झाल्याबद्दल व कोपरगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आ. आशुतोष काळे यांची विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल कोपरगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.सदर ठरावाचे राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वागत करून अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

 कोपरगाव नागरपालिकेची सवर्साधारण सभा आज (शुक्रवार) पार पडली. या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी शहराच्या विविध विकास कामांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले. या सभेत अपंग व्यक्तीसाठी पाच टक्के राखीव निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. त्या बरोबरच शहर हद्दवाढ प्रश्नाबाबत खासगी संस्थेकडून या मालमत्तांचे सर्वेक्षण व आखणी करून लवकरात लवकर कोपरगाव नगरपरिषदेला माहिती सादर करून सदरच्या मालमत्ता तातडीने नगरपरिषद हद्दीत घ्याव्या जेणेकरून हद्दवाढ झालेल्या परिसराचा विकास होण्यास मदत होईल. कोपरगाव शहराच्या रस्त्यांचा प्रश्न मोठा ऐरणीवर आला आहे.शहरातील रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहेत त्याबाबत नगरपरिषदेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आदी मागण्या  राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केल्या. यावेळी नगरसेवक संदीप वर्पे, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, प्रतिभा शिलेदार, वर्षा कहार, माधवीताई वाघचौरे, सैदाबी शेख व मेहमूदभाई सय्यद यांनी सभेत चर्चिलेल्या विषयात सहभाग घेतला.