Breaking News

अमृतवाहिनीत प्रा. दौंडकर यांचे काव्यसंमेलन

 संगमनेर/प्रतिनिधी

 आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने अभिवादन व शेतकरी कवी प्रा.भरत दौंडकर यांचा काव्यसंमेलन कार्यक्रम होणार आहे.सोमवार दि.25 रोजी दुपारी 4.30 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व विधान परिषद सदस्य आ. डॉ.सुधीर तांबे यांचे उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.

   अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले जात असून या निमित्त महाराष्ट्रातील नामवंत कवी,साहित्यीक यांचे व्याख्याने आयोजित केले जातात. सोमवारीही कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी बाजीराव खेमनर, कांचन थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात, शरयु देशमुख, लक्ष्मण कुटे, अ‍ॅड. आर.बी.सोनवणे यांसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृतवाहिनी इंजि.कॉलेज, अमृतवाहिनी पॉलिटेक्नीक, अमृतवाहिनीएम.बी.ए.,डी.फार्मसी, बी.फार्मसी, आय.टी.आय, मॉडेलस्कूल, इंटरनॅशनल स्कूल, युनिअर कॉलेज, न्युडोस्कूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.