Breaking News

बुर्‍हाणनगरला साध्या पद्धतीने विवाह

अहमदनगर/प्रतिनिधी 
 बुर्‍हाणनगर येथील गवळी व काळे कुटुंबीयांनी साध्या पद्धतीने लग्नसोहळा करुन समाजापुढे आदर्श ठेवला. बुर्‍हाणनगर येथील अविनाश गवळी यांची कन्या श्रद्धा गवळी व वाळकी येथील अंजाबापू काळे यांचे  चिरंजीव गणेश काळे यांचा अत्यंत साध्या पद्धतीने लग्नसोहळा झाला. यावेळी हिंदसेवा मंडळाचे माजी मानद सचिव सुनील रामदासी, जुनिअर कॉलेज,भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संदीप कर्डीले, दत्ता तापकिरे, रोहिदास कर्डिले, भगत परिवार,सामाजिक कार्यकर्ते अशोक कचरे, बाणेश्‍वर पतसंस्थेचे चेअरमन राजू कर्डिले, शेखर देशपांडे व बुर्‍हाणनगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. अत्यंत साध्या पद्धतीने झालेला हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता.