Breaking News

नेचरोपॅथी क्लिनिकमध्ये शरीरविक्रय

नवी मुंबई
नेचरोपॅथी क्लिनिकच्या नावाखाली शरीरविक्रयाचा व्यवसाय चालणार्‍या पनवेलमधील श्री वरद नेचरोपॅथी क्लिनिकवर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारला. तसेच, हा व्यवसाय चालविणार्‍या सोनम जांगीड (35) या महिलेला ताब्यात घेण्याची कारवाई केली. सोनम ज्या महिलांच्या माध्यमातून शरीरविक्रयाचा व्यवसाय चालवित होती, त्या तीन महिलांची सुटका पोलिसांनी केली आहे.
पनवेल तालुक्यातील हेडुटने येथील कानपोली भागातील श्री वरद नेचरोपॅथी क्लिनिक चालविणारी महिला सोनम जागींड ही तिच्या क्लिनिकमध्ये महिला व मुलींना शरीरविक्रयासाठी भाग पाडत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन गरड व त्यांच्या पथकाने श्री वरद नेचरोपॅथी क्लिनिकमध्ये बोगस गिर्‍हाईक पाठवून खात्री केली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारला. यावेळी सोनम जांगीड ही महिला मुलींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सोनम जांगीड हिच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियमांप्रमाणे गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले.