Breaking News

आम्हाला समजेल असा निकाल द्या !

सर्वोच्च न्यायालयाची मुंबई उच्च न्यायालयाला विनंती

नवी दिल्ली
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाला समजू शकलेला नाही. त्यामुळे आम्हाला समजेला असा निकाल द्या द्या, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाने मुंबई न्यायालयाकडे केली आहे. न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने म्हटले की, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश अस्पष्ट आहेत. त्यांनी दिलेला निर्णय आम्हाला समजू शकलेला नाही. त्यामुळे खंडपीठाने हा आदेश रद्द करीत पुन्हा एकदा उच्च न्यायालयाकडे पाठवून दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका फौजदारी रिट याचिकेवर देण्यात आलेला एका आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एसएलपी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मुंबई न्यायालयाचा दोन पानी आदेश वाचल्यानंतर हे प्रकरण नक्की काय होते आणि त्यावर कोर्टाने काय निर्णय दिला आहे हे समजू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी देखील उच्च न्यायालयाच्या निर्णयांबाबत अशा प्रकारची टिप्पणी केली आहे. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयालने हिमाचल प्रदेश हायकोर्टाद्वारे देण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे. कारण या निर्णयामध्ये वापरण्यात आलेले इंग्रजी शब्द हे सदोष होते. दुसर्‍या एका खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान हायकोर्टाचा निर्णय रद्द केला होता. कारण या निर्णयामध्ये वादाबाबतचे तथ्य्यांची माहिती दिली नव्हती. तसेच पक्षकारांच्या युक्तीवादाबाबतही काही म्हटले नव्हते. शिवाय हायकोर्टाने यासंबंधीच्या संदर्भांची चौकशीही केली नव्हती.