Breaking News

दुसऱ्याच्या घरातातील लुडबुड 'त्या'स पडली महागात

 बेलापूर/प्रतिनिधी

  दुसर्‍याच्या घरात डोकावणे एका कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांला चांगलेच महागात पडले असुन बेलापूरच्या बाजारपेठेत सकाळी सकाळी झालेल्या भांडणाची गावात चांगलीच चर्चा चालू आहे.

 याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गावातील भाजपा पदाधिकार्‍याच्या घरात कुरापती करण्याचा प्रयत्न एका कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने केला. घरातील आर्थिक व्यवहारा विषयी त्याने भाजपा पदाधिकार्‍याच्या घरच्यांना फोनवर सांगितले.  यावरुन भाजपा पदाधिकार्‍याच्या घरात वाद निर्माण झाले. या वादास कारणीभूत गावातीलच कॉंग्रेसचा 'तो' कार्यकर्ता असल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्‍याने त्यास शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो कार्यकर्ता सापडला नाही. अखेर आज सकाळीच तो कार्यकर्ता बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत आल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्‍याने ‘आमच्या घरात भांडणे लावतोस काय?’ अशी विचारणा करुन त्या कार्यकर्त्याची चांगलीच धुलाई केली. कशीबशी सुटका करुन त्या कार्यकर्त्याने तेथुन पळ काढला. या वेळी मोठा जमाव जमा झाला होता.