Breaking News

जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिंदे

 कोपरगाव / तालुका प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जेऊर पाटोदा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आप्पासाहेब यादवराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीची सत्ता कोल्हे गटाकडे असून पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या विचाराने विकास कामांचा आलेख सरपंच सतिष केकाण यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने चठताच ठेवला आहे, उपसरपंच नितीन सांगळे यांचा कार्यकाळ संपला असल्याने  नूतन उपसरपंचपदी आप्पासाहेब शिंदे यांची निवड निश्‍चित झाली होती.
 निवडणुकीचे कामकाज ग्रामसेविका एस व्ही कोतकर यांनी पाहिले. ग्रामपंचायतीच्या वतीने माजी उपसरपंच नितीन सांगळे व नुतन उपसरपंच आप्पासाहेब शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.