Breaking News

ताप, सर्दी, खोकला, घसादुखी; मुंबईकर हैराण

मुंबई
 बदलत्या हवामानामुळे आणि हवेत आलेल्या गारव्यामुळे मुंबईकरांना ताप, सर्दी, खोकल्याने हैराण केले असतानाच प्रचंड घसादुखी आणि आवाज बसल्यानेही मुंबईकर बेहाल झाले आहेत. हा त्रास संसर्गजन्य असल्यामुळे घसादुखी, घसा बसणे यासारख्या त्रासांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
हवामानामध्ये बदल झाला की संसर्गजन्य तापाचा जोर वाढतो. यंदाही ताप, सर्दी खोकला यासारखा त्रास मुंबईकरांना सुरू झाला. खोकल्याचा त्रास ज्यांना तीव्र स्वरूपात जाणवत नाही त्यांना घसादुखी तसेच घसा खवखवणे, अन्न वा पाणी गिळताना त्रास होणे आदी लक्षणे जाणवतात. जेवल्यावर खोकल्याची उबळ येऊन उलटी आल्याची भावना होते. यासंदर्भात जेजे रुग्णालयाचे कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले की, ‘अशा प्रकारच्या वातावरणामध्ये घसादुखीचा त्रास ही हमखास उद्भवणारी समस्या आहे. त्यासाठी काही वैद्यकीय तज्ज्ञ हे प्रतिजैविकांचा कोर्स सुरू करा, असे सुचवतात, पण प्राथमिक टप्प्यात घसादुखी वा घशाशी निगडित काही त्रास सुरू झाला तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवायला हवी, आहार ताजा आणि सकस घ्यायला हवा. दिवसातून एक फळ खावे.’ ‘काही जणांचा फक्त घसा दुखतो वा घशामध्ये खवखव होऊन तीव्र वेदना होतात, खोकला होता नाही. घशाचा भाग हा लाल झालेला असतो, काहीवेळा टॉन्सिल्स सुजल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये पाणी अधिक प्यायले जाते. त्यामुळे घाम निघून गेल्यानंतर शरिरातील पाण्याची पातळी कायम राहते.