Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर शहरातील उपनगरीय भागात नाशिक-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवार दि.२८ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. घुलेवाडी शिवारात संगमनेर महाविद्यालयाजवळ असलेल्या १३२ के.व्ही. सबस्टेशनसमोर हा प्रकार घडला आहे.

 गुरुवारी रात्री बिबट्या रस्ता ओलांडण्याचा नादात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली, यात त्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे. संगमनेर शहरालगत असलेल्या गुंजाळवाडी, राजापूर आणि घुलेवाडी शिवारातील नागरीवस्तीत काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. गुंजाळवाडी शिवारात तर अद्यापही आणखी दोन बिबटे असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.