Breaking News

अमरधाममधील विद्युत दाहिनी कार्यान्वित करावी : पीपल्स हेल्पलाईनची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील अमरधाम मधील विद्युत दाहिनी वीज बील थकीत असल्याने व व्यवस्थित देखभाल केली जात नसल्याने बंद अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन पारंपरिक पद्धतीने लाकडांच्या सहायाने अत्यंविधी होत आहे. अमरधाममध्ये सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत दाहिनी कार्यान्वित करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी बोरा परिवाराने पुढाकार घेऊन विद्युत दाहिनी बांधली. मात्र त्याचे वीज बील वेळेवर भरले जात नसल्याने व त्याचे व्यवस्थापन आणि देखभाल होत नसल्याने कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेली विद्युत दाहिनी बंद अवस्थेत आहे.
सौर उर्जेचा वापर करुन विद्युतदाहिनी कार्यान्वित केल्यास नैसर्गिक साधनसामुग्रीची बचत होऊन नागरिकांची देखील सोय होणार आहे तसेच शहरात सोलर विद्युत दाहिनी कार्यान्वित करण्यासाठी दानशूर व्यक्ती व व्यापार्‍यांचे सहकार्य घेतले जाणार आहे, असे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.