Breaking News

प्रगत कला महाविद्यालयात संविधान दिनी कार्यक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रकानुसार प्रगत कला महाविद्यालयाच्या वतीने भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या जागृतीसाठी मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेतली.संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या राज्यघटनेमध्ये 395 कलमे असून संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडतो, या मोहिमेत सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.