Breaking News

‘जीएसटी’ बुडविणार्‍या व्यापार्‍यांविरोधात कारवाई

नवी मुंबई 
 वस्तू व सेवा कर (जीएसटी) न भरणार्‍या व्यापार्‍याांंचा पाठपुरवा करण्यासाठी रायगड जीएसटी विभागाने कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. थकबाकीची मोठी रक्कम असणार्‍या 2100 व्यापार्‍यांकडे मिळून 200 कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर थकीत आहे. अशा व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर विभागाचे राज्यकर सहआयुक्त  प्रदीप कडू यांनी दिली.
याबाबत सहआयुक्तांनी कडू यांनी सांगितले की, रायगड विभागातील विवरणपत्र न भरणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांना वेळोवेळी स्मरण पत्र पाठवून सुद्धा त्यांच्याकडून विवरणपत्र भरले जात नाहीत. अशा 4700 व्यापार्‍यांना नोंदणी दाखला रद्द करण्याबाबत नोटीस दिल्या आहेत, तर विवरणपत्र दाखल करणे व विवरणपत्र न भरल्यास एक तर्फी निर्णयाबाबत 5500 व्यापार्‍यांना नोटीस देण्यात आली आहे. 150 व्यापार्‍यांचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. ज्या व्यापार्‍यांनी व्यापार करताना जमा केलेला कर सरकारी तिजोरीत भरला नाही, अशा कराची रक्कम 50 लाखांपेक्षा अधिक असेल व तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विवरणपत्र भरली नसतील, अशा व्यापार्‍यांना पोलीस कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. सदर मोहीम ही पुढील एक महिना चालू राहणार आहे.  विवरणपत्र तात्काळ दाखल करून त्यानुसार येणारा कर भरून होणारी कारवाई टाळा असे आवाहन सहआयुक्तांनी केले आहे.