Breaking News

राजकारणासाठी रामनामाचा जप थांबेल : सुरजेवाला

नवी दिल्ली 
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी अयोध्या निकालानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सामाजिक सौहार्दता कायम ठेवण्याचे आवाहन करत काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. या निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत.
अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे देशभरातून स्वागत केले जात आहे. काँग्रेस पक्षाने देखील या निर्णयाचे स्वागत करत भाजप सरकारवर टीका केली आहे. धर्माच्या नावावर राजकारण करण्याचा दरवाजा बंद झाला, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या निकालानंतर देशातील जनतेने शांताता राखावी असे आवाहन केले आहे. रणदीप सुरजेवाला  यांनी सांगितले की, ’सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे केवळ राम मंदिराच्या बांधकामाचा दरवाजा उघडला नाही. तर, भाजप आणि इतर पक्षांना या विषयाचे राजकारण करण्याचा दरवाजा बंद झाला’, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. त्यामुळे यापुढे राजकारणासाठी श्रीरामाच्या नावाचा उपयोग थांबेल असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.