Breaking News

आ. रोहित पवारांनी कृषी आयुक्तांकडे मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न

जामखेड/प्रतिनिधी

जामखेड-कर्जत मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर आ. रोहित पवार यांनी विभागीय कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याशी चर्चा करून कृषी आयुक्तांना पत्र पाठवत लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे. पत्रामार्फत खालील गोष्टींचा पाठपुरावा करण्यात आला.

  मागेल त्याला शेततळे योजनेतील ६.११.२०१९ अखेर कर्जत व जामखेड तालुक्यातील शेततळ्यांचे अनुदान येणे बाकी आहे. कांदा चाळींचे अनुदान बाकी आहे. हवामान आधारित फळबाग विमा योजना अनेक ठिकाणी फळबाग विमा लागू झाला नाही. या विभागात डाळिंब व फळबाग शेतकऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता पंचनामे करुन तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये ज्वारी व कांदा पिक विम्याची रक्कम लाभार्थींना मिळाली नाही. हरभरा,ज्वारी व इतर पिकांचा विमा काहींना मिळाला तर अनेकांचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. त्या नामंजूर प्रस्तावाचे कारण दिले नसल्याने पूर्तता करणे शक्य झालेले नाही. फ्युचर सेंट्रल या विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्यास सहकार्य होईल. कृषी आधारित फळपिक योजनेतून २०१९-२० साली लिंबू व पेरू पिक वगळले आहे.सदर पिक घेणारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून नैसर्गिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. वरिल परिस्थिती एकट्या कर्जत जामखेडची आहे.मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असून योग्य ती मदत करणे गरजेचे आहे. असे आयुक्तांना निवेदन पत्रात आ. रोहित पवार यांनी सांगितले आहे.