Breaking News

शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करावे

काँग्रेसची मागणी ; पाथर्डी तहसीलवर मोर्चा


पाथर्डी/प्रतिनिधी
अतिवृष्टी, बँकाची दिवाळीखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई,शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग, आरोग्य, शिक्षण आदी समस्यांवर तातडीच्या उपाय योजना कराव्यात यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती अल्पसंख्याक विभागाच्या वतीने नायब तहसीलदार शैलजा सरोदे यांना निवेदन देण्यात आले.अवर्षण ग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ करावे.स्वामीनाथन आयोगाची राज्यात अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

  यावेळी ता.अध्यक्ष नासीर शेख उप अध्यक्ष रवी पालवे, सेवादलचे किशोर डांगे, वसंत खेडकर, संघटक सचिन राजळे, अल्पसंख्यांकाचे तालुका अध्यक्ष अकबर पटेल,मुन्ना खलिफा, जुनेद पठाण,लहानू गर्जे, दिलीप पानखडे, सुरेश डोमकावळे, सय्यद अस्लम, जब्बार आतार, माजी नगरसेवक नसीर आतार, गोवर्धन लवांडे, नितीन खंडागळे, राजू मनेळ, दीपक चंदनशिव, जावेद पिंजारी, शैजादे शेख, योहान खंडागळे, ज्ञानेश्वर भाबड, कल्याण बर्डे आदींसह पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामध्ये १३ लाखांवरून अधिक हेक्टरवरील पिकांचे सुमारे ८ हजार ७९० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी आपत्कालीन काळात त्यांनी तात्काळ मदत केली होती. मात्र भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कोणी वाली उरला नाही.अवर्षण ग्रस्त भागातील शेतकऱ्याचे कर्ज व वीज बिल माफ करावे.स्वामीनाथन आयोगाची राज्यात अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.