Breaking News

भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबई
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून काँगे्रस राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँगे्रस नेते विजय वडट्टेवार यांनी केला आहे. असे कितीही प्रयत्न झाले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्‍वासही या नेत्यांनी व्यक्त केला.
भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 13 दिवस उलटले तरी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. उद्यापर्यंत सत्तास्थापनेचा घोळ मिटला नाही तर राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी रात्री 12 वाजता विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असून त्यानंतर राज्य राष्ट्रपती राजवटीकडे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता फोडाफोडीचे राजकारणंही सुरू झाले आहे.