Breaking News

आ.थोरातांच्या नेतृत्वाखाली विकासाला बळकटी:थोरात

संगमनेर/प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याची विकासाची घोडदौड कायम सुरू आहे. त्याला आणखी बळ मिळेल असा विश्वास कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी काढले.

 यशोधन कार्यालयात रणजितसिंह देशमुख मित्र मंडळाच्या वतीने जोर्वे येथील युवकांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात इंद्रजीत थोरात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक बाबा खरात होते तर व्यासपीठावर मिलिंद कानवडे, अकोले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, सुरेश गावडे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला सहकार महर्षी दादांनी विकासाची परंपरा घालून दिली. हा वारसा आ. बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने जपला असून तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा सचोटीने काम करत आहेत. म्हणून संगमनेर तालुका सहकार,शिक्षण,कृषी,विकास,दूध, सामाजिक सलोखा या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. ही विकासाची वाटचाल आणखी वेगाने होणार आहे.  या सर्व वाटचालीमध्ये आपल्या सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून अनेक जण पडद्याआडून काम करतात. त्यांचा ही सन्मान या जोर्वे येथील तरुणांनी केला ही आनंदाची बाब आहे. यावेळी संजय  थोरात, सरपंच रविंद्र खैरे, बंटी यादव, दीपक बारे, पप्पू जोशी, शरद गिरी, मुकेश काकड, रावसाहेब काकड ,बाळासाहेब दिघे, रमेश दिघे आदी उपस्थित होते.