Breaking News

महाराष्ट्राच्या अस्मितेवर सत्तापिपासूंचा बलात्कार !

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यास उणेपुरे चारपाच तास उरले असताना भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस पुन्हा  मुख्यमंत्री म्हणून  आले. येताना एकटे नाही तर महाराष्ट्रातील एका वजनदार पुतण्याला सोबत घेऊन आले. फडणवीसांसोबत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात  न भुतो असा जबरदस्त ट्वीस्ट आला.क्षणभर राजकारण गोठून गेले.महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या पुतणखोरीचे चक्र या घटनेने पूर्ण केले. याशिवाय सत्तेचा माज चढल्यानंतर राज्यघटनेच्या चिंध्या किती  सहजपणे करता येतात याचा वस्तूपाठही भाजपाच्या नैतिकतेने दाखवून दिला आहे.

होय! शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या अंतिम क्षणी मातोश्रीला तोंडावर पाडणारे नाट्य फडणवीसी नितीने अगदी लिलया घडवून आणले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भुंकप झाला अशा बातम्या  वायू वेगाने पसरल्या. मातोश्री, सिल्वर ओक हादरून गेले. या हादर्‍यांना निमित्त होते अजित पवार यांचा भाजपाला पाठींबा देणे आणि थेट सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे.राजकारणात कु ठल्याही क्षणी काहीही घडू शकते, इथे सदा सर्वकाळ कुणीही कुणाचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही.हे तत्वज्ञान निष्कपट  राजकारणाच्या जिवंतपणाचे लक्ष मानले जात असले तरी शनिवारच्या भल्या सकाळी  घडलेल्या राजकीय घडामोडी या तत्वज्ञानाच्या पलिकडच्या आहेत. शनिवारची भली सकाळ उगवली तीच मुळात सत्तापिपासूंच्या बलात्कारी घडामोडीचे वृत्त घेऊन. सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून जनादेश  मिळालेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यात अपयश येत असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रात असलेल्या राक्षसी सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्रात भाजपाशिवाय अन्य कुणाही राजकीय पक्षाला  सरकार स्थापन करता येणार नाही अशी व्यवस्था राज्यपालांच्या माध्यमातून केली. राष्ट्रपती राजवट लागू करण्यापासून रद्द करण्यापर्यंत केंद्रातील सत्ताधार्‍यांनी राज्यघटनेच्या आपल्या सोयीनुसार  अक्षरशः चिंध्या  केल्या. राज्य आणि देशासमोर अन्य गंभीर प्रश्‍नांची तड लावण्यासाठी दाखवली जात नाही त्याच्या कितीतरी अधिक तातडीने महाराष्ट्राची राष्ट्रपती राजवट उठविण्याची धडपड करण्यात आली. मध्यरात्री कॅबिनेटची  बैठक, लगेच राष्ट्रपतींना बैठकीचा अहवाल, राष्ट्रपतींकडून राज्यपालांना तत्क्षणी पत्र, राज्यपालांकडून सकाळी  पावणे सहा वाजता राष्ट्रपती राजवट उठवून फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पत्र आणि  आठ वाजता शपथविधी. हा सर्व घटनाक्रम घडला तो अवघ्या चार ते पाच तासात.याचा अर्थ भारताचे प्रशासन आणि शासनदेखील वेगवान झाले. हाच वेग कपट निती ऐवजी जनसामान्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक क रण्यासाठी वापरताना मात्र लकवा मारला जातो. यावरून भाजपा सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आमची प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर आहे हे भाजपा नेत्यांकडून वारंवार का सांगितले जात होते याचा  अर्थ महाराष्ट्राला शनिवारच्या भल्या सकाळी उमगला.
गुजरातच्या कपटनितीने महाराष्ट्राच्या अस्मितेवर नेहमीच घाला घातला आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपविण्यासाठी मोरारजी देसाई यांनी 105  बळी घेतले होते. त्याच गुजरातचे प्रतिनिधित्व करणारे नरेंद्र मोदी  आणि अमित शहा महाराष्ट्राच्या अस्मितेवर बलात्कार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नरेंद्र मोदी, अमित शहा काय हे सरळ डोक्याने चालत नाहीत. ते सत्तापिपासू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे सुख पाहवत नाही.  मोठा पक्ष म्हणून भाजपाने सत्ता जरूर स्थापन करावी. पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, पण सनदशीर  मार्गाचा वापर करून. महाराष्ट्राच्या जनतेवर   अत्याचार करण्याचा अधिकार फडणवीस, मोदी आ णि शहा यांना नाही. महायुती त्यांना सांभाळता आली नाही. मित्र पक्ष शिवसेनेला उखडून फेकून देण्याचा औरंगजेबाचा सुलतानी इशारा देवूनही गप्प बसलेल्या शिवसेनेला पायदळी तुडवण्याचा अंगलट आलेला फा जिलपणा युती तुटण्यास कारणीभूत ठरला आहे. राजकारण हे घनदाट जंगल बनले आहे. इथला प्रत्येक राजकारणी शिकारीसाठी टपून बसला आहे. हाती येईल ती शिकार महत्वाची म्हणत तो सापळा रचत आहे.  त्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यशस्वी होत असल्याचे दिसताच भाजपाने पवारांच्या भात्यातील बाण काढून घेतला. पवारांना ते निशस्त्र करण्यात यशस्वी झाले तर शिवसेनेचा गांडीव धनुष्यबाण आपोआप  गळून पडेल, असा कयास भाजपाने बांधला होता.
भाजपा हा शूचिर्भूतता मानणारा पक्ष आहे. तो हिंदुत्वाच्या तत्वावर चालणारा पक्ष आहे. म्हणून 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी शपथविधीला सर्व पंथांच्या संतांना बोलावले होते; आज त्यांच्या शपथविधीला एकही  संत सोडा, सज्जनही नव्हता.  एका रात्रीत महाराष्ट्रात अनेक कांड घडले आहेत. सत्तेचे हे वेश्यावस्तीला लाजविणारे आहे. महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा देश नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा हा   छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने सगळी वस्त्रे काढून राज्यभवनात जो व्यभिचार मांडला त्याला महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही. राज्यात सुसंस्कृत राजकीय नेते हाताच्या  बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक आहेत. सुसंस्कृतपणा हा नीतीमत्तेत असावा लागतो. पवार यांना भाजपाने जो धक्का द्यायला पुढे पाऊल टाकले, ते ब्रह्मास्र भाजपावर उलटेल. कदाचित, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ  घेतलेले अजित पवार स्वगृही परततील. किंवा शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे सरकारकडे जादुई आकडा नसेल. अजित पवार यांनी तिसर्‍यांदा राष्ट्रवादीला वेठीस धरले आहे. पण आजचे त्यांचे धाडस, काकांना  वगळून केले असेल तर ते परवडणारे नाही.
अजित पवार यांना आर्थर रोड जेलमध्ये टाकायला निघालेले देवेंद्र फडणवीस थेट त्यांना उपमुख्यमंत्री करतात आणि त्यांच्या सहकारातील भ्रष्ट्राचारावर मुख्यमंत्रीपदाची चूल पेटवत असतील तर ते शहाजोगपणाचे  लक्षण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बलात्कार झाला आहे. सोबत पुतण्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काकांचे ंराजकारण संपविणार्‍या पुतणखोरीचे चक्रही पुर्ण झाले आहे.

या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील का?
1) राज्यपालांनी अचानक रात्री राष्ट्रपती राजवट कशी उठविली? 2) देवेंद्र फडणवीस यांनी 145 आमदारांची यादी राज्यपालांना दिली का?  3) राज्यपालांनी आमदरांची ओळख परेड घेतली का? 4) इतक्या  घाईत शपथविधी उरकण्याची आवश्यकता होती का? 5) देशावर, राज्यावर फार मोठे संकट उभे होते म्हणून शपथविधी उरकले का?  6) शरद पवारांना सोडून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांबरोबर जातील क ा?  7) अजित पवार इतका मोठा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतील का? 8) राज्यपाल कोश्यारी दबावाखाली काम करत आहेत का?  9) शिवसेनेला दोन दिवसाची मुदत न देणार्‍या राज्यपालांनी एका  रात्रीत बहुमत कसे मान्य केले?  10) राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण पत्र कधी पाठवले. 11) अशा घाणेरड्या राजकारणामुळे यापुढे निवडणुकीत मतदार मतदान करेल का?  त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल असे राज्यपालांना वाटले नाही का?

असेही घडले असेल का?
केंद्रीय मंजुरी असल्याशिवाय राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेता येत नाही.जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी राष्ट्रपती राजवट मागे घेण्याचा प्रस्ताव दिला असता तर भाजपाने प्रस्ताव नामंजूर करून पुढील 6  महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. साठ वर्ष राजकारणात खर्च केलेल्या शरद पवार यांना याची अगोदरच कल्पना व जाणीव होती म्हणून त्यांनी अजित पवारांना फडणवीसांना पाठिंबा द्यायला लावून प हिल्यांदा राष्ट्रपती राजवट संपवली, आता पुढील 7 दिवसात फडणवीसांना बहुमत सिद्ध करावं लागेल आणि फडणवीस ते सिद्ध करू शकणार नाहीत! त्यावेळी शिवसेना-राष्ट्रवादी-काँगेस बहुमत सिद्ध करणार!