Breaking News

जैन ओसवाल पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ईश्‍वर बोरा

अहमदनगर/प्रतिनिधी 
 येथील सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी ईश्‍वर बोरा तर व्हाईस चेअरमनपदी किरण शिंगी यांची एकमताने निवड झाली आहे. संस्थेच्या मार्केटयार्ड शाखेत नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथील कार्यालयीन अधीक्षक किरण आव्हाड  अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीत चेअरमनपदासाठी बोरा यांच्या नावाची सूचना मावळते चेअरमन मनोज गुंदेचा यांनी मांडली. त्यास लता कांबळे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी किरण शिंगी यांच्या नावाची सूचना सुवर्णा डागा यांनी मांडली, त्यास विनय भांड यांनी अनुमोदन दिले.
यावेळी संचालक समीर बोरा, संतोष गांधी, शैलेश गांधी, अभय पितळे, राखी मुनोत, पंडित खरपुडे, विशाल गांधी, राजेंद्र चोपडा, अजित बोरा, प्रमोद गांधी, व्यवस्थापक प्रशांत भंडारी, मार्केटयार्डचे शाखाधिकारी मनोज लुणीया उपस्थित होते.