Breaking News

राहुरी महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश

राहुरी/प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा अहमदनगर येथील वाडिया पार्क येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत राहुरी येथील लोकनेते स्व. रामदास पा. धुमाळ कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक अशी कामगिरी करत विभाग स्तरावर निवड झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे व उपप्राचार्य प्रा. घोडेकर यांनी दिली.

  जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 19 वर्षे मुली 100 मीटर धावणे या खेळा प्रकारात भारती गाडे हिने प्रथम, तिहेरी लांब उडीत तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले. तसेच 800 मीटर धावणे - आढाव वैष्णवी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. ४ हजार 400 मीटर रिले  यामध्ये महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये बेग आरजू, साळवे आकांक्षा, लांबे प्रियंका, कडू किरण यांनी सहभाग घेतला होता. तसेच 4100 मीटर रिलेमध्ये महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला असून यामध्ये बर्डे भारती, गाडे भारती, गडाख कावेरी, लांबे प्रियंका यांनी सहभाग घेतला होता.

  यश संपादन केलेल्या खेळाडूंचे डॉ. बा.बा.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक खा.डॉ. सुजय विखे, अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष  शामराव निमसे, संचालक विजयराव डौले, सुरसिंगराव पवार, नंदकुमार डोळस तसेच सर्व संचालक मंडळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वैद्य सर आदींनी अभिनंदन केले.