Breaking News

विद्यार्थ्यांनी साईबनमध्ये घेतली निसर्गाची माहिती

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील एमआयडीसीच्या मागे असणार्‍या साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये शैक्षणिक सहली येण्यास प्रारंभ झाला असून येथे विद्यार्थी विविध निसर्गाची रूपे पाहून माहिती घेत आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना माहिती देताना व्यवस्थापक शिंदे म्हणाले, “औद्योगिक वसाहतीच्या पूर्वी खडकाळ जमीन होती. छोट्या, छोट्या काटेरी झुडुपांनी हा भाग व्यापलेला होता. अनेक लहान मोठे नदी, नाले होते. इथे सर्वत्र नापीक, ओसाड, पडीकक्षेत्र होते. तिथे साईबन हा 100 एकरावरील पडीक जमीन विकास प्रकल्प आकारास आला. त्यातून कृषी, पर्यावरण आणि पर्यटन विकसित होत गेले.’’
साईबनचा फेरफटका मारताना जरा ही थकवा जाणवत नसून शिवारफेरी करताना वेगळ्या विश्‍वात असल्याची अनुभुती येते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.