Breaking News

प्रज्ञा ठाकूर यांची संसदेच्या संरक्षण समितीवरुन हकालपट्टी

Pragya Thakur
नवी दिल्ली
देशाच्या राजकारणांत उतरल्यानंतर देखी प्रज्ञा ठाकूर यांची आक्षेपार्ह वक्तव्याची मालिका सुरूच आहे. लोकसभेत नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. भाजपला विरोधकांनी चांगलेच घेरले होते. प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे भाजपला चांगलेच बॅकफुटवर जावे लागले होते. भाजपची कोंडी झाल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांची संसदेच्या संरक्षण समितीवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
लोकसभेत एसपीजी संशोधन दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरु असताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करीत नथुराम गोडसे याला देशभक्त असे संबोधले होते. त्यामुळे लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्यांचे हे वक्तव्य सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टिका झाल्याने भाजपाला बॅकफुटवर यावे लागले आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांची सरंक्षण सल्लागार सदस्यपदावरुन हकालपट्टी करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी भाजपाची संसदीय खासदारांची बैठक होती. या बैठकीला येण्यापासून त्यांना थांबवण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमण्यात आली होती. या समितीत एकूण 21 सदस्य आहेत. विरोधी पक्षातील खासदारांपैकी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.