Breaking News

फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून सव्वालाख लंपास

संगमनेर/प्रतिनिधी
 संगमनेर मध्ये असणाऱ्या एचडीबी फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे शटर चोरट्यांनी उचकटले. व आत प्रवेश करून तिजोरीतील एक लाख ४ हजार ३६ रूपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 संगमनेरातील नाशिक-पुणे महामार्गावर सह्याद्री महाविद्यालयासमोर विश्वसुमन पॅरडाईज कॉम्प्लेक्समध्ये एचडीबी फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तिजोरीतील १ लाख चार हजार ३६ रूपयांची रोकड चोरून नेली. एचडीबी फायनान्स कंपनीच्या संगमनेर शाखेचे शाखाधिकारी संदीप माधवराव गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार, सहाय्यक फौजदार शिवाजीराव फटांगरे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कवडे तपास करीत आहेत.