Breaking News

पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीला

अहमनगर/प्रतिनिधी
 शहरातील मुकुंदनगर येथील एक बंद घर फोडून चोरट्याने सुमारे पावणे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रक्कम चोरून नेली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साजीद मन्सूर शेख बाहेरगावी गेल्याने यांचे घर गेल्या आठ दिवसांपासून बंद होते. त्या दरम्यान चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटाची उचकापाचक करून २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रक्कम चोरून नेली. बुधवारी सायंकाळी ते घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्य़ा निदर्शनात आले. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली.