Breaking News

देवेंद्र फडणवीसांना सत्ता वंचित कुणी ठेवले..?

महाराष्ट्रात सत्तांतर झाले.अगदी अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षाला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की ओढवली.निवडणूक प्रचारादरम्यान महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षापासून वंचित  राहणार असा राग आळवणारे देवेंद्र फडणवीस यांनाच सत्तेपासून वंचित रहावे लागले.विरोधी पक्षाबाबत देवेंद्र फडणवीस यांना भेडसावणारी तत्कालीन चिंता दुर करण्यासाठी  शरद पवारांनी जेव्हढी मेहनत घेतली  तितकीच मेहनत अमित शहा यांच्या तटस्थ भुमिकेने घेतली.आणि महाराष्ट्राला एक सक्षम विरोधी पक्ष मिळवून देण्यात मोलाची भर घातली.


देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक गोंडस पण तितकेच आक्रमक मुख्यमंञी लाभले होते.पाच वर्ष महाराष्ट्रासारख्या बहुविचारी राज्याचा कारभार हाकतांना तारेवरची कसरत करूनही मि.क्लीन ही प्रतिमा  आणखी उजळून निघाली.महाराष्ट्रातील फडणवीस मंञीमंडळातील अनेक सहकारी मंञ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत.तथापी मुख्यमंञी म्हणून व्यक्तीगत फडणवीस म्हणून एकही आरोप झाल्याचे आठवत नाही हे  वास्तव त्यांचे वैचारीक विरोधक असुनही मान्य करतो.अर्थात गेल्या पाच वर्षात मुख्यमंञी कार्यालयाच्या माध्यमातून कुठलेकुठले गैरव्यवहार झालेत त्याचा हिशेब महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात बाहेर  येईल हा भाग वेगळा.त्याची सुरूवात गेल्या काही दिवसापासून झाल्याचेही दिसते आहे.मुख्यमंञ्यांचे जानी दोस्त आणि भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची भागीदारी असलेला सिडकोचा हजारभर कोटींचा भुखंड  विकासकाला अवघ्या तीन कोटीला दिल्याची वंदता आहे,योग्य वेळी त्याचा खुलासा होईलही.याखेरीज देवेंद्र फडणवीस  मि.क्लीन मुख्यमंञी म्हणूनच तोपर्यंत ओळखले जातील.
देवेंद्र यांच्यासारखा निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि पाच वर्षे मुख्यमंत्री राहूनही कुठलाही भ्रष्टाचाराचा साधा शिंतोडा नसलेला स्वच्छ माणूस ज्या अपमानास्पद पद्धतीने सत्तेवरून  गेला.
बहुमताचा आकडा हातात नसताना अत्यंत नाचक्की होऊन देवेंद्र फडणवीस यांना अखेर अत्यंत खालच्या मानेने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून आज पायउतार व्हावे लागले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांनी पारदर्शकपणे  राज्यकारभाराचा 5 वर्षे गाडा हाकला  हे तत्वतः मान्य केले तर असा हा सचोटीचा मुख्यमंञी कुणाला नको होता याचा अभ्यास तर करावाच लागेल.
देवेंद्र का गेले? त्यांना कोणी घालवले? असा सचोटीचा आणि प्रामाणिक मुख्यमंत्री कोणाला नको होता? ’निर्मळ’ हा हल्ली ’दुर्मिळ’ झालेला गूण ज्या नेतृत्वाकडे होता ती इमानदार छबी इतक्या सहजपणे कोणी क ा फेकून द्यावी? मग चांगली माणसं राजकारणात येत नाहीत म्हणून आपण सगळेच जो गळा काढतो त्याला तरी काय अर्थ? म्हणूनच देवेंद्र का गेले आणि त्यांना कोणी घालवले हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यांचा शत्रू  कोणी एकच होता की अनेक शत्रू त्यांनी निर्माण केले होते? हे वैरी स्वपक्षातीलच होते की अन्य पक्षातील? वदंता अनेक आहेत. 
महाराष्ट्रात जे काही घडले त्याचे श्रेय भाजपा विरोधक शरद पवारांना देतात.अमित शहा त्याचे खापर मिञपक्ष शिवसेनेवर फोडतात.मित्रपक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी फडणवीसांना घालवले असे  कुणालाही वाटू शकते. पण हे अर्धसत्य आहे. नेत्यांचे म्हणाल तर शरद पवार, सोनिया गांधी हे राष्ट्रीय नेतृत्व आणि उद्धव ठाकरे व संजय राऊत हे देखील प्राप्त परिस्थितीत फडणवीसांचे शत्रू म्हणून दाखवले जात  आहेत.पण हेच वास्तव आहे का?तुम्हा आम्हा सामान्य बुध्दीच्या राजकारणाबाहेरील माणसाला वाटणारी ही शंका भाजपा परिवारातही वावरत  आहे.भाजपच्या आणि विशेषकरून फडणवीसांच्या गोतावळ्यातही या  छुप्या शञुची चर्चा सुरू आहे.भाजपच्या वर्तुळातही आता दबक्या आवाजात हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.भाजप परिवाराची कानोकानी ऐकल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होतो.फडणवीस यांच्या राजकीय जीवन  ते स्वतःच त्यांचे शञू ठरले.कमालीचा आत्मविश्‍वास आणि त्यातून निर्माण झालेली आक्रमकता ही त्यांच्या राजकीय वाटचालीतील अडसर ठरली.या दोन स्वभाव वैशिष्ट्यांमुळे फडणवीस हे नागपुरच्या रेशीम बागेतील  आवडते नेतृत्व बनले होते.
 समोर येत असलेले हे सत्य दिल्लीतील भाजप शिर्षस्थांना स्वीकारणे अवघड झाले आहे.आणि म्हणूनच दिल्लीतील शीर्षस्थ नेतेच  फडणवीसांच्या पतनास जबाबदार आहेत!  दिवसेंदिवस प्रभावशाली होत चाललेल्या  देवेंद्रांमध्ये रा. स्व. संघ भविष्यातील पंतप्रधान शोधत होता. 2024 मधील हा अडथळा म्हणूनच पद्धतशीरपणे संपवण्यात आला. गव्हातून खडा उचलून फेकावा तसे देवेंद्र यांना अलगदपणे उचलून सत्तेबाहेर भिरक वण्यात आले.  एक ’पराभूत’ असा शिक्का त्यांच्या कपाळावर मारून त्यांना महाराष्ट्रातच रोखण्याचा हा डाव आहे.देवेंद्र यांच्या दिल्लीच्या वाटा कायमच्या बंद करण्याचे मनसुबे आहेत. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचेच हे  छुपे षड्यंत्र होते, असे आता बोलले जात आहे. आपल्या मार्गात अडथळे नको म्हणून हे सगळे कारस्थान रचले गेले आणि योजनाबद्ध रीतीने ते दिल्लीश्‍वरांनी तडीस नेले. या सगळ्या व्यूहरचनेतून भारतीय जनता  पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस सारखा उत्तम मुख्यमंत्री तर गमावलाच पण शिवसेनेसारखा पंचवीस वर्षांपासूनचा सच्चा मित्रही काँग्रेस-राष्ट्रवादीकडे नेऊन सोडला. या सगळ्या परिक्रमेत शिवसेनेचे काय  चूकले, असा प्रश्‍नही आता उपस्थित केला जातोय. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. फडणवीस यांना ते ठाऊक होते. फक्त निवडणुकीपूर्वी त्याची घोषणा नको अशी विनंती देवें द्रांनी उद्धव ठाकरे यांच्या समक्ष अमित शहांकडे केली होती. काय शब्द दिलाय हे अमित शहांना पक्के ठाऊक होते. पण दिलेला शब्द नाकारायचा हे ’धोरण’ ठरवले गेले. चाणक्यनिती म्हणून! ही निती ठरवली अ मितभाईंनीच पण जाहीर करायला लावली देवेंद्रांच्या मुखातून. तिथेच उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या मधूर संबंधात  मिठाचा खडा पडला. आदेश दिल्लीचा पण अकारणच उद्धव ठाकरेंच्या नजरेत फडणवीस  व्हीलन ठरले.काय गेम झाला, हे देवेंद्रांना शेवटपर्यंत समजले नाही.  महाराष्ट्राच्या सत्तापेचात दिल्लीकर मार्ग नक्की काढतील हा आत्मविश्‍वास फडणवीस यांना उध्दव ठाकरे यांच्याविरूध्द आक्रमक भुमिका घेण्यास नि मित्त ठरला.त्यात आणखी भर घातली ती दिल्लीश्‍वरांच्या राज्य दुतांनी.
गेल्या महिनाभरातील घटनाक्रम लक्षात घेतला तर अमित शहा यांची तटस्थ भुमिका ही ही एक खेळी होती हे सहज लक्षात येते. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्या भाजप सरकार बनविण्यापासून वंचित राहु शकते  एव्हढा गंभीर पेच निर्माण झाला असतांना अमित शहासांरखा मुत्सद्दी,चाणक्य वगैरे धाटणीचा नेता मार्ग काढण्याऐवजी तटस्थ राहते.यातच सर्व प्रश्‍नांची उत्तरे सामावलेली आहेत.  सरकार आणण्यासाठी किंवा देवेंद्रांना  वाचवण्यासाठी महिनाभरात अमित शहांनी मातोश्रीवर एकही फोन केला नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द तर दिला होताच मग फोन कुठल्या तोंडाने करायचा हा खरा प्रश्‍न त्यांना खजिल करीत असेल.  त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना फोन करण्याचे धाडस अमितभाई सत्ता जाईपर्यँत दाखवू शकले नाहीत.  शेवटी सरकार घालवले पण अमित शहा किंवा मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही.  खास करून अमित शहा यांनी घेतलेल्या टोकाच्या शिवसेनाविरोधी भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील भाजपची नौका बुडाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा प्रामाणिक व कर्तबगार नेतृत्व भाजपाने खच्ची केले.
  मुख्यमंत्री महाराष्ट्राने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर  पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून संघ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत होता. तेच खर्‍या अर्थाने फडणवीसांसाठी मारक ठरले. फडणवीसांचा वाढता प्रभाव  अमित शहांना खटकत होता का, असा प्रश्‍न आता विचारला जातोय. असे म्हणतात की, मोदी यांच्यानंतर आपणच पंतप्रधान झालो पाहिजे हे अमित शहा यांचे स्वप्न आहे. या स्वप्नात सगळ्यात मोठा अडथळा होता  तो देवेंद्र फडणवीस यांचा. तो अडसर दूर करण्याचे काम अमित शहा यांनी केले.
अमित शहांचे डावपेच इथेच थांबले नाहीत.तर आठदहा वर्षापासून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने केले जात होते त्या अजित पवारांना देवेंद्रांच्या दिमतीला पाठवून त्यांची प्रतिमा आणखी मलीन केली.हे सारे  घडून गेल्यानंतर भाजपचे काही नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेला दोन अडीच वर्ष मुख्यमंञी पद द्यायला हरकत नव्हती अशी उपरती बोलून दाखवित आहेत.
 ज्या मिञाचे बोट धरून महाराष्ट्रात पाय पसारले,गेली पाच वर्ष आणि आगामी अडीच वर्ष अशी साडेसात वर्ष भाजपाचा मुख्यमंञी हे समीकरण अमितशहांनी इतक्या सहजासहजी सोडून दिले.शिवसेनेला अडीच वर्षांचे  मुख्यमंत्रिपद देण्याचे औदार्य भाजप अध्यक्ष अमित शहा का दाखवू शकले नाहीत..? हा प्रश्‍न उरतोच. महिनाभरात शहा-मोदींनी ठाकरेंशी एकदाही संपर्क का करू नये हेत देखील एक रहस्यच आहे.  राजकारण  बाजूला ठेवा, पण अगदी व्यापारी दृष्टीने विचार केला तरी 2014 ते 24 या 10 वर्षांतील साडेसात वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मोबदल्यात अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला सोडणे व्यवहार्यच होते. तो शहाणपणा अ मित शहा यांनी का दाखवला नाही? त्यामागचा ’व्यवहार’ वर सांगितला आहेच. देशाची आर्थिक राजधानी असलेले महाराष्ट्रासारखे प्रगतिशील राज्य आणि तेथील सत्ता गमावण्यामागील खरा व्हिलन महाराष्ट्रात नाही  तर तो दिल्लीतच आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर जाऊन चर्चा करणार्या अमित शहा यांनी मागच्या महिनाभरात उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सौम्य नेतृत्वाशी एकदाही भेट,चर्चा सोडा एकदाही फोन का  करू नये? कारण एकच. फडणवीस नको होते. नरेंद्र नंतर देवेंद्र .. हा रस्त्यातील काटा होता. तो हटवला, आणि त्याचे किटाळ शिवसेनेवर झटकले.. संशय घ्यावा अशा अनेक जागा आहेत. सुज्ञास अधिक सांगणे  न लगे.यासोबत फडणवीस यांना आसलेला आत्मविश्‍वास जो निवडणूक प्रचारात ओसंडून वाहतांना महाराष्ट्राने पाहीला.विरोधकांना हीन समजून महाराष्ट्रात विरोधीपक्ष शिल्लक राहणार नाही.सर्वात मोठा विरोधीपक्ष म्हणून  वंचित आघाडी उदयास येईल.अशी भंपकबाजी करणारा फाजील आत्मविश्‍वास आणि असंमजस आक्रमकता असलेल्या फडणवीसांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचे  अमित शहांचे अर्धे मिशन  शरद पवारांनी पुर्ण के ले.काहीही कसेही घडो ,महाराष्ट्राला सक्षम विरोधीपक्ष मिळाला हेही नसे थोडके!