Breaking News

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची होणार बदली

Koshyari Mishra
नवी दिल्ली
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते. राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्याने राज्यपाल काहींच्या टीकेचे धनी झाले होते.
दरम्यान, कलराज मिश्र यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी 22 जुलै रोजी नियुक्त करण्यात आले होते. उत्तरप्रदेशचे ज्येष्ठ नेते असणारे कलराज मिश्र केंद्रीय मंत्रिपदी राहिले आहेत. त्यांनी उत्तरप्रदेशात प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले आहे. ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते.  भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि राज्यसभेचं सदस्यपद भूषवलं आहे. काँग्रेसने कोश्यारी यांच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं होतं. काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी टीका करताना म्हटलं होतं की, सत्याचा विजय झाला आहे हा महत्त्वाचा मुद्दा नसून, राज्यपालांनी ज्याप्रकारे पक्षपातीपणा करत निर्णय घेतले आहेत त्याकडे सर्वोच्च न्यायालयाने पाहिलं पाहिजे. त्यांनी संविधान, नियम, कायदा, परंपरा कशाचीही चिंता केली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी राज्यपालांनी पक्षपातीपणा आणि दुर्भाग्यपूर्ण धोऱणं अवलंबल्याचा आरोप केला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रपतींनी तात्काळ त्यांची बदली करावी असंही त्यांनी म्हटलं होतं.