Breaking News

रेल्वेचे खाजगीकरण नाही :


रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचा निर्वाळा

नवी दिल्ली
केंद्र सरकारने एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कंपनी विक्री करणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानंतर रेल्वेचे देखील खाजगीकरण होईल, असे बोलले जात होते. मात्र रेल्वे खाजगीकरण नाही, असा निर्वाळा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिला आहे.
रेल्वे ही भारताची आणि भारतीयांची संपत्ती असून ती पुढेही भारतीयांचीच संपत्ती राहणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी खासगी कंपन्यांसकडून व्यावसायिक आमि ऑन-पोर्ड सेवांची आऊट सोर्सिंग करण्यात येणार आहे. त्याला खासगीकरण म्हणता येणार नाही, असं गोयल यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात एका प्रश्‍नाला उत्तर देताना पीयूष गोयल यांनी हे स्पष्टीकरण दिलं. पुढील 12 वर्ष रेल्वेला चालवण्यासाठी 50 लाख कोटीचा अंदाजे खर्च येणार आहे. हा एवढा मोठा खर्च सरकार उचलू शकत नाही. त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवाशांना उत्तम सुविधा देणं आणि त्यांना फायदा पोहोचवणं हे याला आमचं प्राधान्य आहे. रेल्वेचं खासगीकरण करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. रेल्वेही देशाची आणि देशवासियांची संपत्ती आहे, असे गोयल म्हणाले. माझ्याकडे दररोज अनेक खासदार रेल्वे मार्ग सुधारण्याच्या तक्रारी घेऊन येत असतात. मात्र रेल्वेसाठी पुढच्या 12 वर्षाकरिता 50 लाख कोटींचा खर्च येणार आहे. हे आपण सर्वच जाणतो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.