Breaking News

शिवसेना, राष्ट्रवादीचे 13-13 तर काँगे्रसचे तर काँग्रेसचे 10 नेते घेणार शपथ


मुुंबई ः महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन बर्‍याच दिवसांचा कालावधी लोटला असला, तरी या सरकारला काही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडत नव्हता. हिवाळी अधिवेशनात केवळ सहा मंत्रिपदावर राज्याच्या कारभार हाकणे सुरु होते. 24 डिसेंबर रोजी होणारा मंत्रिमंडळाचा शपथविधी काँगे्रसचे यादी वेळेवर न आल्यामुळे होऊ शकला नव्हता. मात्र राज्यातील परिस्थिती गंभीर असल्यामुळे गतीमान कारभार करण्यासाठी मंत्रिमंडळाची आवश्यकता आहे.
अखेर महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज सोमवारी होत आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे 13-13 तर काँगे्रसचे 10 असे एकूण 36 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र महत्वाची खाती मिळण्यासाठी तीनही पक्षांकडून जोरदार रस्सीखेच सुरु होती. गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँगे्रसने आपल्या पदरात पाडून घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूरला राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनही पार पडले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात झालेला नाही. सुरुवातीला केवळ मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तसेच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या सरकारमधील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. यामध्ये शिवसेनेचे 13 नेते, राष्ट्रवादीचे 13 नेते तर काँग्रेसचे 10 नेते उद्या मंत्रीपदाची शपथ घेतील. या विस्ताराद्वारे मंत्रिमंडळातील सर्व खाती भरण्यात येणार असल्याचे कळते. यामध्ये शिवसेनेचे 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री तर काँग्रेसचे 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री असतील. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसतर्फे कुणाचा समावेश करायचा यासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची परवानगी घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत.