Breaking News

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून 14 प्रवांशाचा मृत्यू


अलमाटी ः कझाकिस्तानातील अलमाटी शहरात शुक्रवारी सकाळी 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. अपघातग्रस्त विमानात 95 प्रवासी व पाच क्रू मेंबर होते. आलमाटी विमानतळाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.