Breaking News

विधीमंडळाचे 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

Vidhan Bhavan
मुंबई
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, 16 डिसेंबरपासून नागपूर येथे होईल, अशी घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुंबईतील विधिमंडळाचे विशेष अधिवेशन स्थगित करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
नवीन आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्‍वासदर्शक ठराव संमत करून घेणे, विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड करणे, मंत्र्यांचा परिचय उभय सभागृहातील सदस्यांना करून देणे, ठाकरे सरकारचे धोरणात्मक संकल्प व्यक्त करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे संयुक्त सभागृहातील अभिभाषण आणि उभय सभागृहातील दिवंगत सदस्यांसाठी शोक प्रस्ताव, असे कामकाज मुंबईतील या विशेष अधिवेशनात झाले. विधानपरिषद व विधानसभेचे रविवारचेचे कामकाज राष्ट्रगीताने संपले. त्यानंतर उभय सभागृहे संस्थगित करण्यात आल्याची घोषणा सभापती निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतंत्रपणे आपापल्या सभागृहात केली.