Breaking News

राज्य सरकारकडून आगामी वर्षात राहणार 20 सुटया


मुंबई : राज्य सरकारने आगामी 2020 साठी सर्वाजनिक सुट्यांची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार येत्या वर्षी राज्यात 20 सार्वजनिक सुट्या राहणार आहेत. त्यापैकी 4 सुट्या रविवारी आहेत. तसेच बँकांच्या वर्षिक अंकेक्षणासाठी 1 एप्रिल 2020 ही तारीख घोषित करण्यात आली.
राज्य सरकारच्या सार्वजनिक सुटी संदर्भातील अधिसूचनेत नमूद केल्यानुसार ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 5 सार्वजनिक सुट्या मिळणार आहेत. आगामी जानेवारी महिन्यात एक, फेब्रुवारीमध्ये दोन, मार्च महिन्यात दोन आणि एप्रिल महिन्यात 4 सार्वजनिक सुट्या असतील. तर मे महिन्यात 3, ऑगस्टमध्ये 5, ऑक्टोबरमध्ये 3, नोव्हेंबर महिन्यात तीन आणि डिसेंबरमध्ये एक सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात 26 जानेवारी (रविवार) गणतंत्र दिवस, 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज जयंती, 21 तारखेला महाशिवरात्री, 10 मार्च रोजी होळी व 25 मार्च रोजी गुडी पाडव्याची सुटी राहणार आहे.