Breaking News

दिल्ली थंडीने गारठली 2.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद


नवी दिल्ली/मुंबई : राजधानी दिल्ली चांगलीच गारठली आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी कमी होत चालले आहे. दिल्लीतील थंडीने 120 वर्षात पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी 6 वाजून 10 मिनिटाने तापमान 2.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. याआधी, शुक्रवारी दिल्लीमध्ये किमान 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर आयानगरमध्ये 3.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
दिल्लीमध्ये यंदाच्या मोसमातील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याचे सांगितले जात आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी दिल्लीकरांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. दिल्लीकरांना रविवारपर्यंत थंडीचा कहर सहन करावा लागणार आहे.