Breaking News

पंधराशे विद्यार्थ्यांनी लिहिले 3 हजार फुटांचे पत्रअमरावती : भारतचे प्रथम कृषिमंत्री डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती महोत्सवा निमित्त त्यांच्या सन्मानार्थ जिल्ह्यातील नांदगाव हायस्कूल येथील 1500 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत तीन हजार फुटांचे विक्रमी वाचण्यातुन विचाराकडे अशा आशयाचे दीर्घ पत्र लिहिले आहे. या पत्राचं विमोचन 24 डिसेंबर रोजी करण्यात आले.
डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातील दिन दलित, आर्थिक दुबळे, मागासवर्गीय, बहुजनांच्या विद्यार्थ्यांना सहज सुलभ शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने 1931 साली अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. आज ही संस्था रयत शिक्षण संस्थे नंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. नांदगाव हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी डॉ भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रति असलेल्या श्रद्धा या दीर्घ पत्रातुन व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जन्मापासून तर त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, वैदिक विचार, घटना समितीतील उल्लेखनीय कामगिरी,जागतिक पातळीवरील कृषी प्रदर्शनीचे आयोजन, इत्यादींच्या बाबतीत विचार सादर केले आहे. डॉ पंजाबराव देशमुख सारख्या महान व उत्तुंग कर्तव्याची उंची असलेल्या व्यक्तीला देशातील सर्वोच्च असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी जणू या विद्यार्थ्यांनी केली आहे. कृषिमहर्षी, शिक्षण महर्षी डॉ भाऊसाहेब देशमुख यांचे सर्व क्षेत्रातील कार्य महान असून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या दीर्घ पत्रातून व्यक्त केलेल्या भावना केंद्र सरकार दरबारी पोहचवल्या जाईल असे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी सांगितले. या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेतला असून याची शासनाने दखल घ्यावी असे मत नांदगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुहासिनी शेंडे यांनी व्यक्त केले.तर अनेक वर्षांपासून भाऊसाहेब देशमुख सारख्या महापुरुषाला भारतरत्न मिळावा म्हणून मागणी करण्यात येत आहे परंतु याची दखल घेतली गेली नाही मात्र विद्यार्थ्यांनी आपली प्रांजळ व सुलभ भावना तिन्ही भाषेतून लिहून व्यक्त केली आहे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची केंद्र सरकारने निश्‍चितच दखल घ्यावी असे आवाहन उपक्रमाच्या मुख्यशिक्षिका भारती बढे यांनी यावेळी केले.