Breaking News

आंदोलकांकडून करणार 50 लाख वसूललखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार्‍या आंदोलकांना वसुली नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार विविध जिल्ह्यातील प्रशासनाने एकूण 130 आंदोलकांना वसुली नोटीस पाठवली आहे. मालमत्ता जप्त होण्यापासून वाचवायची असेल तर लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, असं या नोटीसमध्ये बजावण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या आंदोलकांकडून एकूण 50 लाख रुपये वसूल केले जाणार आहेत. बुधवारी रामपूर 28, संभल 26, बिजनोर 43 आणि गोरखपूरमध्ये 33 जणांना नोटीस देण्यात आली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करताना या आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं होतं. हिंसक आंदोलन करणारे हे आंदोलक आता प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. या नोटीसमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, रामपूरमध्ये 14.86 लाख रुपये, संभलमध्ये 15 लाख आणि बिजनोरमध्ये 19.7 लाख रुपयांच्या मालमत्तेचं आंदोलनात नुकसान झालं. तर गोरखपूरमध्ये किती नुकसान झालं, त्याची अंतिम आकडेवारी प्रशासनाने जाहीर केलेली नाही.