Breaking News

पुण्यात पुन्हा जळीतकांड, 9 दुचाकी जाळल्या


पुणे :  पुण्यात वाहने जाळण्याचे सत्र सुरु असून अज्ञाताकडून दुचाकी जाळून परिसरात दहशत पसरवण्यात येत आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे येथील पौड रोड परीसरातील म्हातोबा नगर भागात रस्त्यालगत पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनांचे नुकसान करत आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संकेत ज्ञानोबा उभे (वय-26 रा. पुणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड रोड परीसरातील म्हातोबा नगर भागातील किष्किंदा पोलीस चौकच्या परिसरात आज पहाटे पावणे चारच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यालगत पार्किंग केलेल्या चार दुचाकींना आग लावण्यात आली. या घटनेत चार दुचाकी जळून खाक झाल्या तर पाच दुचाकींचे नुकसान झाले आहे. या परिसरात वाहनांची तोडफोड करून वाहने जाळण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.