Breaking News

किड्स किंगडम विद्यालयात आनंद मेळावा सोनई/वार्ताहर
किड्स किंगडम विद्यालयाने अयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम व आनंद मेळाव्यास ग्रामस्थ व पालकांनी मोठा प्रतिसाद देत मनसोक्त आनंद लुटला. सायंकाळी सहा वाजता विद्यालयाच्या आवारात कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्या किर्ती बंग यांनी विद्यालयात राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
 अदिती फाउंडेशनचे अध्यक्ष केदारनाथ बंग व सचीन बंग यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. आनंद मेळाव्यात पालकांनी खाद्यपदार्थांचे स्टाॅल लावले होते. खवय्यांनी स्टाॅलवर मोठी गर्दी केली होती. आनंद मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. चिमुकल्यांच्या नृत्यास उपस्थितांनी विशेष दाद दिली. मराठमोळ्या खाद्यपदार्थां बरोबरच चायनीज पदार्थाचे स्टाॅल लागले होते. या वर्षी विद्यालयाला 'सीबीएसई' मान्यता मिळाल्याबद्दल प्राचार्या बंग व शिक्षक स्टाफचे अभिनंदन करण्यात आले.