Breaking News

साईबाबा महाविद्यालयाचे एनएसएस शिबिर उत्साहात



शिर्डी/प्रतिनिधी
 श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे पार पडले. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राहाता आणि श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी या दोन्ही महाविद्यालयांनी एकत्रितपणे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे संचालक ज्ञानदेवराव म्हस्के, रघुनाथ बोठे, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ आकाश किसवे, दिलीप उगले, सरपंच सचिन मुरादे, उपसरपंच उषा मुजमुले, प्राचार्य डॉ बी.के.सलालकर, प्राचार्य विकास शिवगजे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. या शिबिराचा समारोप समारंभ धनश्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, रावसाहेब लावरे, प्रकाश मुरादे, अधीक्षक राजेंद्र कोते, दिनेश कानडे, सरपंच सचिन मुरादे,  महाविद्यालयीन कर्मचारी-विद्यार्थी उपस्थित होते.
 यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धनश्री विखे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मोठे व्हावे, आपल्या आईवडिलांची सेवा करावी, समाजातील अपप्रवृत्तीना प्रतिबंध करावा. मोठ्यांचा सन्मान करावा. समाजात आपले नाव मोठे होतांना आपल्या आईवडिलांचे, शाळेचे, महाविद्यालयाचे, गावाचे नाव मोठे होते. डॉ संतोष खेडलेकर यांनी 'सोशल मिडिया आणि आपण', डॉ आकाश किसवे यांनी 'व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन', ब्रह्मकुमारी वर्षा दीदी यांनी 'महिला सबलीकरण', सतिष वैजापूरकर यांनी 'विनोदाकडून जनजागृतीकडे' आणि संतोष उबाळे यांनी 'एड्स जनजागृती' या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. सोनाली हरदास डॉ जयश्री दिघे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दादासाहेब डांगे, डॉ. व्ही. आर. पावडे, डॉ. संतोष औताडे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. .राधाकृष्ण विखे, खा.डॉ. सुजय विखे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.