Breaking News

भाजपचे पानिपत ; काँग्रेस-झामुमोची मुसंडी


रांची ः झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून, भाजपचे पानीपत झाले असून, काँगे्रसने झारखंड मुक्ती मोर्चोच्या आघाडीने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. महाराष्ट्रानंतर भाजपच्या हातून झारखंड राज्य निसटले आहे. विधानसभेच्या 81 जागा असणार्‍या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून,  सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला 28 पेक्षाही कमी जागा मिळत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा 29 जागांसह सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. भाजपला 28 तर काँग्रेसला 14 जागा मिळत आहेत.