Breaking News

शहरी नक्षलवाद्यांकडून देशात अफवा पसरवण्याचे काम - पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन हिंसाचार सुरु आहे, मात्र विरोधक जनतेच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही कोणतीही योजना लागू करताना धार्मिकतेला थारा दिलेलना नाही. पण काँग्रेस देशातील जनतेची दिशाभूल करुन खोट्या अफवा पसरवण्याचे काम करत आहे. मुस्लिम समाजाला भ्रमित करुन राजकारणाची पोळी भाजण्याचे काम सुरु आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन काँग्रेससह इतर विरोधकांना टोला लगावला.
लोकसभा आणि राज्यसभेत आपल्या उज्वल भविष्यासाठी जो निर्णय घेतला त्याच्या बाजूने देशातील सर्व नागरिकांनी उभे राहून जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा आणि दोन्ही सभागृहाचा सन्मान राखायला हवा, असे आवाहन मोदींनी केले. दिल्लीमध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रामलीला मैदानात आयोजित रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते.