Breaking News

महिलेच्या छळप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा


पारनेर/प्रतिनिधी
 माहेरून पैसे आणावे यासाठी वारंवार शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेने पारनेर पोलिस  ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
  छळाप्रकरणी ज्योती बाळू पवार (वय ३०) या महिलेने पती बाळू पोपट पवार (वय ४०, रा. जांबूत, ता. संगमनेर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पतीने तू मला आवडत नसून घरखर्चासाठी माहेरून पैसे आणावे अशी वारंवार मागणी करत शारीरिक मानसिक छळ केला. तुझ्यामुळे माझे वाईट झाले असून तू घरातून निघून जा असे म्हणत वारंवार छळ केला. या छळाला कंटाळून पत्नी माहेरी निघून आली पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत