Breaking News

सरपंच दहिफळेंच्या हत्येतील आरोपी जरबंद


अहमदनगर / प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या हत्येतील संशयित मुख्य आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. मंगळवार दि. १७  रोजी दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहादेव दहिफळे याच्यासह अकरा जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येतील संशयित मुख्य आरोपी शहादेव दहिफळे हा अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होता. बुधवारी उपचार पूर्ण झाल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी शहादेवला अटक केली.