Breaking News

भाजपच्या कराड शहराध्यक्षपदी एकनाथ बागडी यांची फेरनिवड

कराड / प्रतिनिधी ः भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवड कार्यक्रमांतर्गत आज कराड शहर अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यावेळी एकमताने एकनाथ बागडी यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली असे निवडणुक अधिकारी  बबन कांबळे यांनी जाहीर केले. बैठकीस जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस सुदर्शन पाटसकर, प्रदेश सदस्य विजय पाटील,जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल, तसेच शहर उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी,  उमेश शिंदे,  सरचिटणीस राहुल भिसे, माजी नगरसेवक पेंढारकर, जिल्हा चिटणीस नितीन वास्के, सागर लादे, नितीन शाह, शुभम लादे, संतोष कांबळे, प्रमोद शिंदे, उल्हास बेंद्रे, कराड शहरचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.