Breaking News

शंकरराव गडाखांना मंत्रिपद; सोनईत जल्लोषसोनई/प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नेवासे मतदार संघातील क्रांतिकारी पक्षाचे आ. शंकरराव गडाख यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्याने सोनईत कार्यकर्त्यांनी  फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
 प्रमथच मंत्री मंडळाच्या विस्तारात नेवासा मतदार संघातील लोकप्रतिनिधीस संधी मिळाली आहे. त्या अनुशंघाने आ.शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली तालुका निश्चित प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे, असे कार्यकर्ते डॉ. ज्ञानेश्वर माऊली दरदले यांनी सांगितले. यावेळी नितीन शेटे, रोहिदास कोठवळ, सलीम शेख, अनिल निमसे, गुलाबराव दरदले, सीताराम कदम, धोंडू करमासे, ज्ञानदेव दरदले, अंकुश शिंदे, प्रकाश साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.