Breaking News

तळेगावमध्ये चार गोवंश जनावरांची सुटका


 संगमनेर/प्रतिनिधी 
 संगमनेर तालुक्यातील तळेगाव शिवारात एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीतून चार गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  याबाबत अधिक माहिती अशी, आज (सोमवार) सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील तळेगाव शिवारात चौफुलीवर सहा. पोनि. कादरी आणि त्यांचे सहकारी सरकारी वाहनातून गस्त घालत असताना त्याठिकाणी एका पांढऱ्या रंगाची पिकअप वाहनची (क्र. एमएच १२ एफडी २२८०) तपासणी केली. त्यात आरोपी वाहन चालक जाकीर रशीद शेख (वय-३६, रा. कुरण ता.संगमनेर) हा आपल्या गाडीत चार गोवंश जनावरांना अतिशय क्रूरतेने आणि कोणत्याही अन्नपाण्याविना कोंबून त्यांची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी यावेळी आरोपी वाहन चालक जाकीर याला वाहनासह जनावरांना ताब्यात घेतले. पोना. अनिल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जाकीर शेख याच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करणारे अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ड)(ह)(ई) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोना. बी.ए. खेडकर करीत आहे.