Breaking News

सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरुच राहणार : नगरसेवक वाकळे


अहमदनगर / प्रतिनिधी
रक्ताच्या नात्याबरोबरच मैत्रीचे नाते जपल्याने आपले जीवन यशस्वी होते. हेच नाते जीवनाला चांगले रुप देण्याचे काम करते. चांगले मित्र एकत्र आल्यावर समाजामध्ये चांगले काम उभे राहत असते. वाढदिवस साजरा करत असताना विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची प्रेरणा मित्रांपासून मिळाली.  त्यामुळे समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम अव्याहतपणे सुरू असून ते यापुढील काळातही कायम राहिल, असे प्रतिपादन नगरसेवक कुमार वाकळे यांनी केले.
नगरसेवक कुमार वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, बबनराव वाकळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, संपत बारस्कर, मनोज कोतकर, निखील वारे, बाळासाहेब पवार, रविंद्र बारस्कर, सुनील त्रिंबके, सचिन जाधव, संभाजी पवार, दादा दरेकर, दता तापकिरे, किरण दाभाडे, साहेबराव काते, फारुख रंगरेझ, संतोष लाडे, शिवाजी साळवे, मनोज दुलम, अण्णा इथापे, हभप बाबासाहेब पडोळे, बाळासाहेब शिंदे, पंकज वाकळे, दत्तात्रय वाकळे, पप्पू वाकळे, गोरख कातोरे, प्रभाकर भोर, विशाल वाकळे, मुन्ना शेख, संजय कडूस आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, महापालिकेत काम करत असताना नगरसेवक कुमार वाकळे हे नेहमीच चांगल्या कामासाठी आग्रह धरतात. महापालिकेतील काम करणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. त्यांच्या कामाचा आदर्श सर्वच नगरसेवकांनी घेतला पाहिजे, असे मतही महापौर वाकळे यांनी व्यक्त केले.