Breaking News

भाजपविरोधात लढा उभारावा लागेल


मुंबई ः स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांनी या देशात फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवले होते. तीच परिस्थिती भाजपाचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा सरकार विरोधात स्वातंत्र्य लढयाप्रमाणे लढा उभारावा लागणार आहे, असे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
मुंबईमध्ये काँग्रेसचा फ्लॅग मार्चच्या पार्श्‍वभूमीवर गांधी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थोरात बोलत होते. लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 134 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शनिवारी काँग्रेसच्या वतीने देशभरात ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये आज काँग्रेसकडून संविधान बचाओ रॅली काढण्यात आल्या होत्या. दिल्लीत होणार्‍या कार्यक्रमामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आसाममध्ये माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी उपस्थित होत्या. तर मुंबईत शनिवारी सकाळी 10 वाजता फ्लॅग मार्चला सुरुवात झाली.