Breaking News

विद्यार्थ्यांचे कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन


भिंगार / प्रतिनिधी
कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शाळेच्या विद्यार्थांनी क्रीडा, वारली , कलेच्या शैक्षणिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळे दिल्ली येथील ललित कलाअकादमीमध्ये त्यांना कला सादर करण्याची संधी  मिळाली. हे यश विद्यार्थ्यांच्या कष्टाचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी बोलताना केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, भिंगार कँम्पचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, आरोग्य समिती चेअरमन शुभांगी साठे, सदस्य रविंद्र लालबोंद्रे, संजय सपकाळ, अँड. आर.  आर. पिल्ले, महेश नामदे, सुभाष पाटील,  कार्यालयीन अधीक्षक उज्वला पारनाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास मोहिते, कारभारी आव्हाड, आशालता बेरड, खैरमहंमद खान आदी उपस्थित होते.
 मिटके पुढे म्हणाले, शाळेतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामधून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चित मदत होत आहे. म्हणून अशा  उपक्रमांची गरज आहे.  यावेळी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य.कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, प्रवीण पाटील, आरोग्य समिती सभापती शुभांगी साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .    विविध क्षेत्रात यश संपादन करणा-या विद्यार्थ्याना  पारितोषिके प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी वारली चित्रांच्या ऐतिहासिक अहमदनगर शहराची ओळख करून देणा-या विवध चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक  संजय शिंदे यांनी केले. अहवाल वाचन मुख्याध्यापिका आशालता बेरड यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगावर आधारित नेत्रदिपक नृत्याने उपस्थितांच्या देशप्रेमाच्या भावना अनावर झाल्या.  शामली साळवे स्वालेहा शेख यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अरविंद कुडिया यांनी आभार मानले.