Breaking News

कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी

पुणे :
यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरुवार, 26 डिसेंबरला दिसणार आहे. या आधी नऊ वर्षांपूर्वी कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसले होते. भारतात सकाळी 7.59 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार आहे. मुंबईतून सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झालेला दिसेल. तर सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्य चंद्रामुळे झाकोळलेला दिसेल. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. 
या ग्रहणादरम्यान ‘रिंग ऑफ फायर’ म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे ग्रहण दिसणार असून ते कंकणाकृती असेल. खग्रास सूर्यग्रहणापेक्षा ते वेगळे असेल. यातच सूर्याचा मधला भाग चंद्र मध्ये आल्याने झाकला जातो. त्यामुळे त्याची कडा प्रकाशमान दिसते, त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. कंकणाकृती सूर्यग्रहण पूर्व सौदी अरेबियात दम्ममच्या पश्‍चिमेला सुरू होईल. ते भारतात दक्षिण भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावर सुरू होईल. पहिल्यांदा ते कोईमतूरमध्ये कंकणाकृती स्थितीत दिसेल. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.  स्लूह डॉट कॉम या संकेतस्थळावर सकाळी 8.30 पासून ग्रहणाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. दक्षिण भारतात केरळमधील कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड आणि कर्नाटकातील मंगलोर, म्हैसूर व तामीळनाडूतील कोईमतूर, इरोडे, करुर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई येथून कंकणाकृती दिसेल. महाराष्ट्र  आणि उर्वरित भारतातून 60 ते  70 टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.
कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून देखील हे ग्रहण दिसणार आहे. यादिवशी ’रिंग ऑफ फायर’ पाहण्याचा उद्भूत योग येणार आहे. पु़ढील वर्षी 21 जून 2020 रोजी होणार्‍या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा व उत्तराखंड या राज्यातील प्रदेशातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून त्यावेळीही खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ग्रहणामुळे ओदीशामध्येही शाळा, महाविद्यालयांना एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  सूर्य,चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये नियमितपणे होणार्या प्रकाश आणि सावलीच्या लपंडावामुळे यंदा वर्ष अखेरीस गुरूवारी (ता.26) कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या दक्षिणेकडील भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. तर उर्वरीत भागात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल. भारतासह आशियाखंड तसेच आफ्रिका खंडातील इथिओपिआ व केनिया, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागांत दिसणार आहे. पुणेकरांना हे ग्रहण पाहता यावे. याकरीता ज्योतिर्विद्या संस्था, नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन यांनी केली असल्याची माहिती आयुकातर्फे कळविण्यात आली आहे. दहा वर्षांच्या कालावधीनंतर भारतीयांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळत आहे. यापूर्वी 15 जानेवारी 2010 मध्ये भारतामधून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी ऍन्ड ऍस्ट्रोफिजिक्स् (आयुका ) च्या मुक्तांगण विज्ञान संशोधिका तर्फे कळविण्यात आल्या प्रमाणे हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल. सकाळी आठ ते साडेअकरा वाजेपर्यंत हे ग्रहण दिसेल. नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशनतर्फे बालगंधर्व रंगमंदिर जवळील महर्षि विठ्ठल रामजी शिंदे या पूलावर सूर्यग्रहणासोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजिला आहे. यावेळी ग्रहण पाहण्यासाठी चष्मेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे दुर्बिणीव्दारे सूर्यग्रहण निरीक्षणाची संधी पुणेकरांना मिळणार आहे. काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रिज) येथे ही व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया तर्फे भारतातील खगोलशास्त्र संबंधीत सार्वजनिक प्रसाराचे काम करणार्या संस्थांच्या माध्यमातून सूर्योत्सव साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती आयुका तर्फे कळविण्यात आली.